ग्रामपंचायतमहाराष्ट्रयोजनासोलापूर

७६ ग्रामपंचायतींमध्ये ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ शासकीय सेवा व योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महूद (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकारी योगेश कांबळे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १७) ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला. शासन निर्णयानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील ७७ गावांमध्ये महिनाभर हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी योगेश कांबळे यांनी दिली. अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणारे विविध दाखले व सेवा, शासकीय योजनांची माहिती, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ, ग्रामसभा व विविध सभांचे आयोजन, वृक्षारोपण, विविध शिबिरे तसेच अन्य लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत.500‘शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत व प्रभावीपणे पोहोचविणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमात सहभागी होऊन उपलब्ध सेवा व योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन गटविकास अधिकारी योगेश कांबळे यांनी केले.

यावेळी मारुती लुबाळ, भानुदास मेटकरी, मंडळ अधिकारी प्रशांत जाधव, ग्राम महसूल अधिकारी कैलास गुशिंगे, विस्तार अधिकारी आत्माराम कोळी, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button