बार्शीच्या सुनबाई MPSC पास, भूमिका कानडेंची दुय्यम निबंधकपदी प्रथम श्रेणीत निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : नुकतेच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बार्शीची सरशी या निकालात दिसून आली. बार्शीपुत्र ऋतिक आगरकरने राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. तर, दुसरीकडे बार्शीच्या सुनबाईंनीही एमपीएससी परीक्षेत बाजी मारली असून भूमिका विशाल कानडे यांची दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदासाठी निवड झाली आहे. भूमिका यांचं माहेर सोलापूर असून सासर बार्शी आहे. त्यामुळे, त्यांच्यावर दोन्हीकडून अभिनंदानाचा वर्षावर होत आहे.500भूमिका यांनी एन.के. ऑर्चिड इंजिनिअरींग कॉलेज, सोलापूर येथून सॉफ्टवेअर इंजिनियर पदवी प्राप्त केली. त्यानंतर, त्यांनी एमपीएससी परीक्षेतून मंत्रालयात नोकरी मिळवली. सध्या त्या मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहे. तरीही त्यांची वरिष्ठ पदाचे ध्येय बाळगून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. आता, नुकतेच जाहीर झालेल्या एमपीएससी निकालातून त्यांची दुय्यम निबंधक प्रथम श्रेणी पदावर निवड झाली आहे. भूमिका यांचे पती सिव्हिल इंजिनियर असून बार्शी सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे, असोसिएशनच्या वतीनेही भूमिका आणि कानडे कुटुंबियांचे अभिनंदन करण्यात आले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या