अहिल्यानगरमहाराष्ट्र

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राशीन आणि कर्जतमध्ये भव्य तिरंगा रॅली

‘हर घर तिरंगा’ उपक्रमातून राष्ट्रप्रेमाचा जागर; नागरिक, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अहिल्यानगर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राशीन व कर्जत येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच तिरंग्याप्रती सन्मान, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे सकाळी ९.३० वाजता भव्य तिरंगा पायी रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. यावेळी देण्यात आलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर कर्जत शहरात भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये युवक, विद्यार्थी, नागरिक, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तिरंगा ध्वजांनी सजलेल्या मोटारसायकलींसह सहभागी झालेल्या नागरिकांमुळे शहरातील वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले.500या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, तिरंग्याचा सन्मान राखावा आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने साजरा करावा, असा संदेश देण्यात आला.

‘हर घर तिरंगा’ अभियान हे केवळ ध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारे अभियान आहे. या भावनेतून राशीन आणि कर्जत परिसरातील नागरिकांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंग्याप्रती असलेला आदर आणि राष्ट्रभक्ती व्यक्त केली.

भव्य तिरंगा रॅलीमुळे कर्जत तालुक्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या भावनेचा जागर केला.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button