बार्शी – पिंपरी (सा) एस टी बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह, गावकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण; विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा) येथिल ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली बार्शी-पिंपरी (सा) एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.गावातून नियमित एसटी बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते पुष्पहार घालून लाल परीचे पूजन करण्यात आले.केंद्रप्रमुख अविनाश काशीद,चंद्रकांत काशीद यांच्या हस्ते चालक केदारी नरवडे,वाहक चंद्रकांत नले यांचा शाल पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

एसटी बस सेवा उपलब्ध झाल्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी,महिला,ज्ये,ष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. यापूर्वी प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत होता. आता नियमित बससेवेमुळे हा त्रास कमी होणार आहे.गावाला तालुक्याच्या ठिकाणाशी तसेच परिसरातील महत्त्वाच्या गावांशी जोडणारी बससेवा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करणे सोपे होणार असून,ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना व इतर आवश्यक कामांसाठी प्रवास करणे सुलभ होणार आहे.500एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी बार्शी आगार प्रमुख विजय हांडे, सेवानिवृत्त शिक्षक भीमराव काशीद,पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी,सरपंच प्रमिला काशीद,पोलिस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य,संबंधित एसटी प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले.बससेवा नियमित व वेळापत्रकानुसार सुरू राहावी तसेच बार्शी-वैराग-पिंपरी आणि बार्शी, ढाळे पिंपळगाव,पिंपरीमार्गे, वैराग बससेवा सुरू व्हावी अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. एसटी बस सेवा ही गावाच्या विकासासाठी महत्त्वाची सुविधा असून, तिचा सर्व ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या