क्रीडा विषयकमहाराष्ट्रसोलापूर

अस्मिता खेलो इंडिया पुणे विभागीय वुशू महिला लीग स्पर्धेत सोलापूरच्या विद्यार्थिनींचे यश

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. १४ ऑगस्ट २०२६ : अस्मिता खेलो इंडिया पुणे विभागीय वुशू महिला लीग स्पर्धेत सोलापूर शहरातील प्रिशिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, बी ग्रुप, सी ग्रुप तसेच शिव मारुती मंदिर कराटे क्लासच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. या यशाबद्दल सर्व विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना सिहान दिलीप शिंदे , फुलचंद जावळे , माधव शेरीकर आणि रितेश शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.500या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये स्नेहा हिप्परगी, प्रांजल माटेटी, हर्षिता येर्झल, नेहा गट्टी, वेदिका म्याकल, लक्ष्मी म्याकल, स्वाती चौगुले, भावना बोडा, प्रांजली चिलवेरी, स्नेहल तुम्हा, समृद्धी तुम्हा, अपूर्वा नदांल, अनिश्का पासकंटी, सिद्धी धुमाळ, आरोही भालेकर आणि अमृता सोनवणे यांचा समावेश होता.

विद्यार्थिनींच्या या यशामुळे सोलापूर शहराच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भविष्यातही या विद्यार्थिनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button