अमरावतीपत्रकार विषयकमहाराष्ट्र

आयआयएमसीत इंग्रजी व मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी स्पॉट प्रवेश प्रक्रिया 13 ऑगस्टला

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अमरावती : भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती परिसरातील इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता रिक्त जागांवरील प्रवेशासाठी स्पॉट (वाक इन) प्रवेश प्रक्रिया गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्रवेश रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार व निर्धारित आरक्षण धोरणानुसार गुणवत्ता यादीच्या आधारे दिले जाणार आहेत.

केंद्रीय विद्यापीठे प्रवेश परीक्षा (सीयुईटी-पीजी ) २०२६ अंतर्गत जन संवाद आणि पत्रकारिता (COQP17) या विषयात मेरीट प्राप्त उमेदवारांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिला जाईल. तसेच, सीयुईटी-पीजी मार्फत परीक्षा देऊ न शकणारे, मात्र कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळविलेल्या पात्र उमेदवारांनाही स्पॉट (वाक इन) प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अशा उमेदवारांना प्रवेशासाठी १३ ऑगस्ट रोजी लेखी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्ता व निर्धारित आरक्षणाच्या निकषांनुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेश करीता वयोमर्यादेची अट असून अनारक्षित प्रवार्गासाठी २५ वर्ष, ओबीसी करीता २८ वर्ष तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांग उमेदवारा करीता ३० वर्ष आहे.500प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयआयएमसी, अमरावती परिसरात सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, त्यांची स्वसाक्षांकित छायाप्रती, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे तसेच आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयआयएमसी तर्फे करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रवेश अडचणी संदर्भात डॉ. राजेश सिंह कुशवाहा (9415862377), डॉ. विनोद निताळे (9860046706), रोहन तायडे (8275734035) कार्यालय (0721-2668180), यांच्याशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. अशी माहिती संस्थानचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा यांनी दिली आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button