महाराष्ट्रशिबीरसोलापूर

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथेजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता शिबीर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य तो कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा आणि त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा स्तरावर समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संगीता खंदारे, माजी कौशल्य विकास अधिकारी दत्तात्रय देवळे, जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक तज्ञ समुपदेशक/अधिकारी पार्थ तेरकर यांनी तालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील विविध कोर्सेसची व अल्पबचत गट स्थापनेबाबतची सखोल उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर शिबिराकरीता जिल्ह्यातील एकूण 55 माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच कार्यालयाकडील कर्मचारी उपस्थित होते.5000

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता बाबतची पार्श्वभूमिका दत्तात्रय देवळे यांनी मांडली व कार्यक्रमाचे आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पवार संजीव व्यंकटराव यांनी व्यक्त केले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button