बार्शीमदतमहाराष्ट्र

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शीच्या वतीने दहिटणे येथील कै विजय जगझाप यांच्या कुटुंबीयास 20,000/- हजारांची आर्थिक मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : तालुक्यातील दहिटणे गावातील बौद्ध समाजातील कष्टकरी युवक विजय जगझाप हे पुण्यावरून आपल्या दहिटणे गावात आपल्या आईला अज्ञात वाहनांनी धडक दिल्यामुळे आईस भेटण्यासाठी आले होते. तेथे किरकोळ कारणावरून भांडण होऊन त्यात विजयची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या दुःखात आम्ही सर्व समाज बांधव सामील होऊन बौद्ध समाजावर होत असलेले अन्यायाबाबत संबंधित पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे अशी मागणी केली.

यावेळी पिढीताची पत्नी यांच्यावर दोन मुले व वृद्ध सासू-सासर्‍यांची संपूर्ण जबाबदारी असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीचीआहे.प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पीडितांना आज रोजी आर्थिक स्वरूपात 20,000/- रुपयाचा चेक त्यांना देण्यात आला. 50000याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे,सहसचिव प्रा.अशोक वाघमारे,जेष्ठ मार्गदर्शक सदस्य प्रा.टी एस मोरे,मधुकर पालखे, नागनाथ सोनवणे, संजय सरवदे,अतुल काळेगावकर, वैरागचे वाघमारे, तेजस न्यूज चे पत्रकार राहुल भालशंकर हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू कांबळे यांनी जगझाप कुटूंबीयांचे सांत्वन केले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button