देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात तरुण विद्यार्थी लढ्याचा हा प्रारंभ आहे – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : “दिल्लीमधील जंतर-मंतरवर चालू असलेले आंदोलन हे देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात तरुण विद्यार्थी लढ्याचा हा प्रारंभ आहे. सोनम वांगचूक यांच्या अंदोलनाला आम्ही पाठिंबा नोंदवत, सरकारच्या आंदोलन मोडण्याच्या कृतीचा निषेध व्यक्त करतो. ” असे कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले; ते दिनांक 20 जुलै 2026 रोजी शिवसृष्टी बार्शी येथे झालेल्या आयटक कामगार केंद्र व पुरोगामी जन संघटना यांच्या वतीने शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांचे दिल्ली मधील जंतर-मंतर येथील नीट परीक्षेचा पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी चालू असलेल्या 21 दिवसांचे उपोषण केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने मोडून काढत त्यांना अटक करण्यात आली आहे या विरोधात निदर्शने आंदोलनात ते बोलत होते. पाऊस चालू असताना आंदोलनकर्ते पावसामध्ये घोषणा देत उभे होते.
कॉम्रेड तानाजी ठोंबरे पुढे म्हणाले; “देशातील बुद्धिमान विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा दिल्या परंतु भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेने त्यांना यश मिळेल ही खात्री संपवून टाकली आहे. धनिकबाबांची मुले पेपर फोडतील व देशातील प्रस्थापित शिक्षण व्यवस्था त्यांना मदत करेल अशी परिस्थिती आहे. जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांनी या युवक विद्यार्थ्यांचा आवाज उठवला आहे. सरकार मात्र हुकुमशाही पद्धतीने बोलू इच्छित नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री राजीनामा देण्यास तयार नाही. आंदोलनावर बळाचा वापर केला जात आहे. लोकशाही संपवण्याचा भाजप केंद्र सरकारचा हा घाट आहे. केंद्र सरकारच्या हिटलरी वृत्तीला मोडण्यासाठी देशातील युवक विद्यार्थी एकवटला आहे. महात्मा फुले , शहीद भगतसिंग, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संघर्ष यासंयुक्त ताकतीच्या विचारातून हे आंदोलन उभे राहिले आहे; हे आंदोलन सत्ताधीशांची सत्ता संपवूनच थांबेल हे स्पष्ट दिसत आहे.”
यावेळी आयटकचे जिल्हासचिव कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद, अनिरुद्ध नखाते, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचे युवराज घाडगे, मनिषा घाडगे, आयाज मुजावर, सोहेल शेख, ताहिर बारसकर, अनिरुद्ध नखाते , मयूर ननवरे, प्रा. प्रेमसागर राऊत, प्रा. डॉ. महादेव ढगे, सुजाता वाघमारे डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे लहू आगलावे, भारत भोसले, आनंद गुरव, संपत खताळ, श्रीकांत सुरेगावकर, भारती मस्तुद , निर्मला सरवदे, सुवर्णा उबाळे, अवधूत सोनवणे, बांधकाम कामगार संघटनेचे बालाजी शितोळे, भारत चव्हाण ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनचे वरद नखाते, काजल खूडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





