‘सैराट’ फेम ‘सल्या’च्या (अरबाज शेख) वडिलांच्या उपचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून लाख मोलाची मदत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘सैराट’ मधील ‘सल्या’ या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांवर सध्या सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अरबाजच्या कुटुंबावर आलेल्या या संकटसमयी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने संवेदनशीलतेचे दर्शन घडवत १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीचा धनादेश नुकताच अभिनेता अरबाज शेख याच्याकडे सुपूर्द करण्यात आला.5000आज सकाळीच उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन अरबाज शेख आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत, मदत करण्याचे आश्वासन दिले होते.5000परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे दातृत्व दाखवले. त्यांनी अरबाजच्या वडिलांच्या उपचारासाठी तातडीने १,००,०००/- (एक लाख रुपये) चा धनादेश त्वरित अरबाजकडे सोपवला. वळसंगकर हॉस्पिटलमधील उपचाराच्या खर्चासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे. ऐन संकटसमयी एका उदयोन्मुख कलाकाराच्या कुटुंबाला धीर देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे आणि दातृत्वाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या