अहिल्यानगरमहाराष्ट्रयोजना

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी १ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी २२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या परीक्षेसाठी २ लाख ४८ हजार ७५८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी महाराष्ट्रातील ११ हजार ६८२ विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती कोटा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण समाविष्ट आहे.

विद्यार्थ्यांना निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in व https://mscenmms.in उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना (दरमहा एक हजार रूपये ) दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच शालेय शिक्षण संचालक (योजना) यांच्याद्वारे केले जाते, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button