न्याय विभागबार्शीमहाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बार्शी मे.सत्र न्यायालयाकडून आरोपीस जामीन मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : दिनांक 10 जुलै 2026 रोजी बार्शी येथील मे.सत्र न्यायाधीश सो.श्री. एस. व्ही. केंद्रे साहेब यांनी आरोपी नामे शिवलिंग हरिभाऊ गुळवे यास लग्नाचे अमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात जामीन मंजूर करून दिलासा दिला.

यात अधिक माहिती अशी की पीडितेने बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी नामे शिवलिंग गुळवे याचे विरुद्ध त्याने सन 2020 ते 2026 यादरम्यान पीडीते सोबत लग्नाचे खोटे अमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्या संदर्भात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69, 115(2), 352, 351(2), 351 (3) अन्वये गुन्हा दाखल झाला.500सदर फिर्यादीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यावरून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली व न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडी मध्ये केली. त्यानंतर आरोपीने अडव्होकेट अमोल अलाट यांचेमार्फत बार्शी येथील मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. 500सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादमुळे दिनांक 10 जुलै 2026 रोजी मे.न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करून दिलासा दिला. सदर जामीन प्रकरणात आरोपीतर्फे एडवोकेट अमोल अलाट, ऍड. विशाल गोणेकर, ऍड. पी. पी. वाघमारे, ऍड. पांडुरंग घोलप यांनी काम पाहिले तर फिर्यादी तर्फे ऍड.सुदर्शन सोनवणे, ऍड. योगीराज पुरवंत यांनी काम पहिले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button