प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठरलेले BLO मनोज तवले; लग्नानंतर रजा संपताच रुजू होऊन 99.92 टक्के फॉर्म वाटप पूर्ण

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : प्रशासनातील एखादा कर्मचारी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर समर्पण आणि प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडतो, तेव्हा तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. बार्शी तालुक्यातील यादी भाग क्रमांक 247 चे बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मनोज तवले भाऊसाहेब यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मनोज तवले यांचा विवाह 27 जून 2026 रोजी झाला होता. त्यानिमित्त त्यांना 3 जुलै 2026 पर्यंत रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र रजा संपताच सोमवारी त्यांनी तत्काळ कामावर रुजू होत सहाय्यकाच्या मदतीने फॉर्म वाटपाचे काम हाती घेतले आणि कामाला वेग दिला.500सध्या ते लाडोळे येथे मुक्कामी राहून काम करत आहेत. यादी भाग क्रमांक 247 मध्ये एकूण 1,255 मतदार असून त्यापैकी 1,254 मतदारांना म्हणजेच तब्बल 99.92 टक्के फॉर्मचे वाटप त्यांनी पूर्ण केले आहे. तसेच 348 फॉर्मचे (27.72 टक्के) डिजिटायझेशनचे कामही त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे, यादी भाग 247 व्यतिरिक्त त्यांच्याकडे यादी भाग क्रमांक 286 चा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे. त्या भागात ते मूळ BLO नसतानाही अतिरिक्त तलाठी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पूर्वी त्या भागातील काम प्रलंबित असताना तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या सूचनेनुसार त्यांनी काम हाती घेतले आणि अतिरिक्त जबाबदारी असतानाही सुमारे 65 टक्के काम पूर्ण केले.500एका आढावा बैठकीत कामाचा वेग कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले. मात्र त्यावर कोणताही प्रतिवाद न करता त्यांनी ते शांतपणे स्वीकारले आणि काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांच्या या सकारात्मक आणि जबाबदार भूमिकेचे प्रशासनातील अधिकारी व सहकारी कौतुक करत आहेत.

कर्तव्याप्रती निष्ठा, जबाबदारीची जाणीव, वेळेचे महत्त्व आणि कोणतीही तक्रार न करता काम पूर्ण करण्याची वृत्ती यामुळे मनोज तवले भाऊसाहेब हे प्रशासनातील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा आदर्श ठरत आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button