क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत फायनान्सच्या नावाने लुटमार करणारी टोळी जेरबंद, दोन आरोपींना तात्काळ अटक; सर्वसामान्यांना फसवणाऱ्या एजंट्सवर कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याचे सांगून दुचाकी जप्त करण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

दिनांक १४ जून २०२६ रोजी दुपारी सतीश विजयराव हावळे (रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) हे आपल्या मुलाच्या नावावर असलेली हीरो पॅशन मोटारसायकल (एच२५ बीसी ३८८३) घेऊन बार्शीकडे येत असताना कुसळंब टोलनाक्याच्या पुढे एम.पी. पेट्रोल पंपाजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी मोटारसायकलची चावी काढून घेतली आणि “या गाडीवर फायनान्सचे कर्ज आहे, आम्ही जप्त करणार” असे सांगितले.5000फिर्यादीने गाडीवर कर्ज असल्याचे नाकारले तरी आरोपींनी १२ हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केली. सतीश हावळे यांनी भीतीमुळे १० हजार रुपये फोनपे व रोख स्वरूपात दिले. पैसे घेतल्यानंतर चावी परत देताना आरोपींनी त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. त्याचबरोबर मारहाण, शिवीगाळ आणि धमकीही दिली. या प्रकरणी दिनांक १५ जून २०२६ रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेत सपोनि महेश माने यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली. अनिकेत सुनिल रसाळ (वय २६ वर्षे, रा. तुळजापूर रोड, मांगडे चाळ, बार्शी), ओंकार दीपक परदेशी (वय २८ वर्षे, रा. भवानी पेठ, बार्शी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींनी श्रीराम फायनान्ससह अन्य फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट म्हणून काम करत अवैध पद्धतीने लोकांना त्रास देऊन पैसे उकळण्याचे काम चालविले होते.5009या प्रकरणात आणखी कोणत्याही व्यक्तीला फायनान्स कंपनीच्या एजंट्सकडून अशा प्रकारची लूट किंवा त्रास झाला असेल तर त्यांनी तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी सपोनि महेश माने यांनी केले आहे.

या कामगिरीचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांनी केले. पोलिस निरीक्षक महेश माने, पो.स.ई. भालेराव, सपोफौ. गवळी, उंदरे, खांडेकर, बोबडे, घाडगे, देशमुख, कावळे, बचुटे, दासरे, लोंढे आदींनी ही कारवाई यशस्वी केली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button