कृषीनांदेडप्रशासनमहाराष्ट्र

कृष‍ि विभागाची धडक कारवाई अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

नांदेड : भोकर तालुक्यातील मौजे बल्लाळ तांडा येथे अनधीकृतरित्या डयुपलीकेट रासायनीक खते (20:20:013)विक्री करत असल्याची गोपनीय माहीती जिल्हा व विभागीय विभागीय भरारी पथक भरारी पथकास मिळाली. त्यानुसार बालाजी माणिका करंडेकर राहणार भोकर या आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्लाळ तांडा ता. भोकर जि. नांदेड येथे श्रीदेव लक्ष्मण चव्हाण यांच्या घरासमोर अनधीकृतपणे बेकायदेशीररित्या व विना ई-पॉस व्दारे भेसळयुक्त रासायनीक खत विकत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी असलेली अशोक लीलॅड MH-26/ BE9407 या गाडीमध्ये भेसळयुक्त रासायनीक खत एनपीके (20:20:013) एकुण 60 बॅग प्रत्येकी वजन 50किलो ग्रॅ.किंमत 1800/- रुपये प्रती बॅग असे एकुण 108000/- व गाडीची आंदाजे किंमत 600000/- असा एकुण 708000/-किंमतीचा मुददेमाल करुण पोलीस स्टेशन भोकर येथे जमा करण्यात आला आहे.500सदरील कार्यवाही विभागीय कृष‍ि सहसंचालक कार्यालयातील गुणन‍ियंत्रण तंत्र अध‍िकारी बालाजी मुंडे, जिल्हास्तरीय भरारी पथकातील पथक अध्यक्ष सचीन कपाळे, मोहिम अध‍िकारी जिल्हा परीषद,नांदेड, ज‍िल्हा भरारी पथकातील सदस्य सचीव अमोल पेकम, जिल्हा गुणवत्ता न‍ियंत्रण निरीक्षक, तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव, भोकर पंचायत समितीचे कृष‍ि अध‍िकारी(गुन‍ि)संदीप कोसकेवार, भोकर कृष‍ि अध‍िकारी कार्यालयातील गुणनियंत्रण निरिक्षक पी.एम.कद्रेकर यांच्या पथकाने संयुक्त कार्यवाही केली.

जिल्ह्यामध्ये रासायन‍िक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास क‍िंवा विनापरवाना विक्री होत असेल अथवा खते उपलब्ध असतांना व‍िक्री करत नसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा, परवानाधारक कृषि निविष्ठा केंद्रातूनच निविष्ठा खरेदी कराव्यात असे आवाहन कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.590

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button