प्रशासनबुलढाणामहाराष्ट्र

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील निमखेड गावासाठी टँकर मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बुलढाणा दि.21 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेड राजा तालुक्यातील निमखेड गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.50000निमखेड येथे 570 पशुधन व 910 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 23 हजार 840 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button