उद्घाटनकोल्हापूरमहाराष्ट्र

जयसिंगपुरात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती शाहू महाराज स्टेडियममुळे क्रीडा क्षेत्रास चालना

B1न्यूज मराठी नेटवर्क500

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन तसेच आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी उद्यानाच्या विकासाला महत्त्व आहे, असे सांगून छत्रपती शाहू महाराज स्टेडियममुळे जयसिंगपूर शहरातील क्रीडा क्षेत्राला निश्चितच चालना मिळेल, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जयसिंगपूर नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’ चे लोकार्पण पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते झाले. या सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके यांच्यासह नगरसेविका गिरमल कोळी, तेजश्री पाटील, रुपाली बंडगर, सचिन चौगुले, मिनल नांद्रेकर, सचिन निटवे, शकुंतला मछले, लक्ष्मण गोसावी, बजरंग खामकर, महेश कलकुटगी, स्वाती मादनाईक, उज्वला वाघवेकर, पराग पाटील, अशोक मळगे, तबसुम फरास, अर्जुन देशमुख, गीता भोसले, अर्चना आडगाणे, शितल गतारे, प्रविण बलदवा, लता गाडेकर यांच्यासह मिलिंद भिडे, पराग पाटील, राहुल बंडगर, अस्लम फरास, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.500या उद्यानामध्ये आवश्यक नागरी सुविधा, सुशोभीकरण तसेच नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या दौऱ्या दरम्यान पणन व राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी जयसिंगपूर येथील अद्ययावत उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्टेडियमची पाहणी करुन स्टेडियममध्ये उपलब्ध सुविधांचीही माहिती घेतली. यावेळी स्टेडियमची उभारणी व सुविधांचेही त्यांनी कौतुक केले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button