बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोक अदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली ०२ कोटींची वसुली

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर एस. शर्मा साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर, एस. एस. शिंदे यांचे सहकार्याने, बार्शी तालुका विधी सेवा समिती, बार्शी व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व २३७९ असे एकुण २४५७ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने मिटवुन त्यात सुमारे प्रलंबीत प्रकरणात अनुक्रमे ०१ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रूपये व दाखलपुर्व प्रकरणांत ७५ लाख ६६ हजार ७४ रूपयांची वसुली झाली या राष्ट्रीय महा-लोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी असे ३७२१ व दाखलपुर्व ६५०४ असे एकुण १०२२५ प्रकरणे लोकअदालत पॅनल मध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.5000या लोक अदालती मध्ये बार्शी न्यायालयातील एकुण चार पॅनल करण्यात आले होते. त्यात जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे , सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती पी. व्ही. राऊत, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती एच. यु. यु. पाटील, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती आर.पी. बागडे असे एकुण चार पॅनल होते. तसेच २रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती जी. एस. पाटील, यांचे गुन्हा कबुलीचे विशेष न्यायालय चालु ठेवण्यात आले होते.5009 पॅनल क. ४. श्रीमती आर. पी. बागडे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर यांचे पॅनलसमोर वयोवृध्द पक्षकार सखुबाई शंकर गवळी यांचे तडजोडीकामी न्यायाधीश स्वता दालनाबाहेर गेले व तडजोडीबाबत पुर्तता केली. जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण ०१ प्रकरण तडजोडीने मिटुन त्यात सुमारे १२ लाख हजार इतक्या रक्कमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली.

एन. आय. अॅक्ट १३८ च्या एकुण १३ प्रलंबित प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे २० लाख १७ हजार ६०० रूपयांची वसुली तर रक्कम वसुलीच्या ०१ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात १० लाख १९ हजार ८८१ रूपयांची वसुली झाली. न्यायालयातील प्रलंबीत कबुलीची ५७ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. त्यात सुमारे ४१ हजार २०० रूपयांची दंड वसुल करण्यात आला.

सदर लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग नोंदविला. राष्ट्रीय ( बार्शी जनता टाइम्स) महालोकअदालत मध्ये यशस्वी करण्यासाठी वकिल संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, सर्व न्यायालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका तसेच फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी, विज वितरण कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या