मानेगाव केंद्रात श्री संत गाडगेबाबा विद्यालयाचा 10 वीच्या निकालात डंका

0

पूजा पवार 93.40 टक्के गुणांसह केंद्रात प्रथम तर नेहा खोत 92 टक्के गुणांसह तृतीय

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

माढा : पुणे बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत माढा तालुक्यातील मानेगाव परीक्षा केंद्रात श्री विठ्ठल ज्ञानपीठ निमगाव (टें) संचलित,आनंदनगर-मानेगाव येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर डंका बजावला असून विद्यालयातील विद्यार्थिनी पुजा योगेश पवार हिने 93.40 टक्के गुणांसह केंद्रात प्रथम तर नेहा आण्णासाहेब खोत हिने 92 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला आहे.5009श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयामध्ये गुणानुक्रमे हर्षदा पृथ्वीराज कापसे हिने 88.40 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक,प्रणोती श्रावण गवळी हिने 78.40 टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे.विद्यालयातील प्रत्यक्ष बोर्डाची परीक्षा दिलेल्या 22 पैकी 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तुकाराम कापसे, प्रवीण लटके,तनुजा तांबोळी, शिवाजी भोगे,सचिन क्षीरसागर,सुनील खोत,सुधीर टोणगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.500मानेगाव येथील दहावीच्या परीक्षा केंद्रात श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय आनंदनगर-मानेगाव,संजीवनी विद्यालय मानेगाव,श्री जगदंबा विद्यालय धानोरे देवी, यशवंतराव मोहिते विद्यालय खैराव व आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय मालवंडी येथील 255 हून अधिक विद्यार्थी परीक्षेस बसले होते. श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर मानेगाव केंद्रात निकालात बाजी मारल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.5009यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी आमदार बबनराव शिंदे,जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सचिव प्रणिता शिंदे,युवानेते कृष्णा शिंदे,गटशिक्षणाधिकारी विकास यादव,केंद्रप्रमुख रमाकांत पवार,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्यासह शिक्षक व पालकांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या