लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी चंद्रकांतदादा पाटलांचे पाऊल

0

स्वतःचे ‘SIR मॅपिंग’ पूर्ण करत नागरिकांना केले आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क5009

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज स्वतःचे SIR (Special Intensive Revision) मॅपिंग आज कोथरुड मध्ये पूर्ण केले. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या प्रक्रियेत स्वतः सहभाग नोंदवून, त्यांनी पुणेकर आणि राज्यातील नागरिकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.5000मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून, हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केले. यामुळे त्यांची मतदार यादीतील माहिती आता पूर्णपणे सुरक्षित आणि अद्ययावत झाली आहे.5000“लोकशाहीत मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव अचूक असणे आवश्यक आहे. मी माझे SIR मॅपिंग पूर्ण केले आहे, आता आपली बारी आहे. दुबार नावे टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्यासाठी सर्व नागरिकांनी तातडीने आपले मॅपिंग पूर्ण करावे.” असे आवाहन ना. पाटील यांनी सर्व मतदार बांधवांना केले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या