आदर्श विद्यालय, रातंजनचा दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील आदर्श विद्यालयाने इयत्ता दहावी (SSC) बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीमुळे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.5000यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. देशमुख श्रीराम सूर्यकांत याने ८४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. काझी रुमान रफिक याने ८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर आतार रिहान रज्जाक याने ७९.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.500000विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

विद्यालयाच्या १०० टक्के निकालामुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रतिनिधी : गौतम नागटिळक5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या