प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी शहर पोलिसांची सामाजिक बांधिलकी; हरवलेल्या चिमुकल्याला आईच्या स्वाधीन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : बार्शी शहर पोलिस ठाण्याने सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत हरवलेल्या पाच वर्षीय मुलाला सुखरूपपणे त्याच्या आईच्या ताब्यात देत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी बस स्थानक परिसरात सकाळच्या सुमारास डायल 112 वर एका पाच वर्षीय मुलाबाबत कॉल प्राप्त झाला. मुलगा एकटाच आढळून आला असून त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक नसल्याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिस कर्मचारी पोका/412 मोहन कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले व बार्शी शहर पोलिस ठाण्यात आणले.

5000पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाची चौकशी करण्यात आली. चौकशीत मुलाने आपले नाव अधिराज औदुंबर कुंभार असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व व्हॉट्सॲपच्या सहाय्याने मुलाच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला.5000दरम्यान, मुलाची आई दिपाली औदुंबर कुंभार (रा. कुसई, ता. तुळजापूर) या बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. आपल्या मुलाला सुखरूप पाहताच त्यांना अश्रू अनावर झाले. पोलिसांनी मुलाला आईच्या ताब्यात देत त्यांना मुलांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ही कामगिरी पोका/153 राऊत, पोका/412 मोहन कदम व पोका/918 वैभव भांगे यांनी पार पाडली. यावेळी पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना प्रवासादरम्यान लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.5000



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button