महाराष्ट्रमेळावासोलापूर

सोलापूरमध्ये १७ एप्रिल रोजी रोजगार मेळावा

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्या विद्यमाने शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उपलब्ध पदे
प्रिन्सीपल, लिपिक, लॅब टेक्निशियन, लॅब इन्चार्ज, इलेक्ट्रिक ऑपरेटर, इंजिनिअर, मार्केटिंग, हेल्पर, असिस्टंट अकाउंटंट, फॅशन मर्चंडायझर, लाईन मॅनेजर, प्रिंटींग प्रेस, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डिजिटल मार्केटिंग अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता
१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी, बी.कॉम, एम.कॉम, एमबीए, एम.एड. अशा शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. एकूण ५६ पेक्षा जास्त रिक्तपदे १० उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचित केली आहेत.
5000

मुलाखतीचे ठिकाण व वेळ

दिनांक: १७ एप्रिल २०२६ (शुक्रवार)

वेळ: सकाळी १० ते दुपारी १

ठिकाण: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट पार्क चौक, सोलापूर

उमेदवारांनी रिझ्युमच्या तीन प्रती व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

संपर्क
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२१७-२९९२९५६ या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. तसेच https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी.

सहायक आयुक्त श्रीमती संगीता खंदारे यांनी सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button