पाणी विभागबार्शीमहाराष्ट्र

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरबार्शी तालुक्यातील तीन गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : तालुक्यात सध्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवरही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून, आगामी मे महिन्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, 2025 मध्ये झालेल्या भरघोस पावसामुळे तालुक्यातील विहिरी, ओढे, नाले, बंधारे तसेच लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण झाला. याचाच परिणाम म्हणून सध्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही.5000
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेत 23 गावांसाठी टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात आवश्यकतेनुसार विहीर अधिग्रहण, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, गावनिहाय मागणीनुसार तातडीची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता अजितकुमार वाघमारे यांनी दिली.
5000
टंचाई आराखड्यातील गावे – या आराखड्यात रऊळगाव, तुळशीदासनगर, कळंबवाडी (आ), बोरगाव, झाडी, घाणेगाव, आळजापूर, खडकलगाव, गुळपोळी, अरणगाव, भातंबरे, पानगाव, गोरमाळे, शेलगाव (मा), शेलगाव व्हळे, धोत्रे, खामगाव गाताचीवाडी, घोळवेवाडी, वानेवाडी, कुसळंब, भोयरे, रुई पिंपळगाव (धस) आदी गावांचा समावेश आहे.
सध्या भोयरे, खडकलगांव व रास्तापूर या तीन गावांनी विहीर अधिग्रहणासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. उन्हाची तीव्रता वाढत गेल्यास आणखी गावांकडून पाणीपुरवठ्याबाबत प्रस्ताव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
5000
मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यात घोळवेवाडी, धोत्रे, खडकलगाव, राऊळगाव व कळंबवाडी (पा) या गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्या अनुभवाच्या आधारे यंदाही प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.सध्या बार्शी तालुक्यात पाण्याची परिस्थिती समाधानकारक असली तरी येणाऱ्या कडक उन्हाचा विचार करून प्रशासन सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button