कार्यशाळामहाराष्ट्रसोलापूर

इंग्रजी साहित्यावरील ऑनलाईन कार्यशाळा सोलापूर विद्यापीठामार्फत उत्साहात संपन्न

अभ्यास,सराव व मार्गदर्शन नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक: डॉ. पालके

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर्स अंतर्गत इंग्रजी विभागामार्फत नेट-सेट पेपर २ इंग्रजी साहित्य विषयावरील एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा गुगल मीटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती व ती सर्वांसाठी विनामूल्य खुली होती. अभ्यास, सराव व मार्गदर्शन नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहे, असे मत डॉ. पालके यांनी व्यक्त केले.5000
कार्यशाळेत संसाधन व्यक्ती म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल पालके हे उपस्थित होते. त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून इंग्रजी साहित्यातील विविध वाङ्मयप्रकार नाटक, कविता, कादंबरी, लघुकथा आणि अकाल्पनिक साहित्य यांचे अत्यंत मुद्देसूद व सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले. तसेच उतारा आकलनाच्या माध्यमातून चिकित्सक वाचन, विचारप्रक्रिया, तार्किकता व विश्लेषण क्षमता कशी विकसित करावी यावर त्यांनी विशेष भर दिला.
5000
यावेळी नेट-सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, रचना, गुण विभागणी, कट-ऑफ आणि सखोल विश्लेषण यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. भाषा, भारतातील इंग्रजी, सांस्कृतिक अभ्यास, साहित्यिक समीक्षा, दुसऱ्या महायुद्धानंतरचे साहित्यिक सिद्धांत तसेच संशोधन पद्धती या घटकांवरही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत सहाय्यक प्राध्यापक रब्बाना शेख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते यांनीही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर्सच्या संचालिका डॉ. अंजना लावंड या होत्या.
50000या कार्यशाळेमुळे नेट-सेट परीक्षेच्या तयारीबाबत आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाल्याचे मत सहभागी संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गणेश संकपाळ व डॉ. व्ही. एल. लेंडवे यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले.5000

5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button