जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने आज श्री वेंकटेश फिलामेंट्स, गाताचीवाडी, बार्शी येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 115 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराच्या एक दिवस आधी सर्व महिलांचे CBC व RBS तपासणीसाठी रक्त नमुने घेण्यात आले होते.
आनंदाची बाब म्हणजे एकाही महिलेमध्ये मधुमेह (शुगर) आढळून आला नाही. मात्र 8 ते 10 महिला अॅनिमिक असल्याचे निदर्शनास आले. तसेच 5 ते 6 महिलांना ECG, जवळपास 40 महिलांना पॅप टेस्ट, तर 1 महिलेला सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. आवश्यक असणारी औषधे महिलांना तेथेच उपलब्ध करून देण्यात आली. याच शिबिरामध्ये 75 महिलांची नेत्र तपासणी देखील करण्यात आली.
या शिबिरासाठी रो. डॉ. योगेश सोमाणी, डॉ. लैला तांबारे, डॉ. अमिता पाटील, डॉ. स्नेहल घेवारे व डॉ. क्षमा बकाल यांनी महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. रक्तदाब व वजन तपासणीसाठी सौ. पल्लवी हिंगमिरे व सौ. ओहाळ यांनी सहकार्य केले. तसेच रो. गौरव कामठाणे यांनी आवश्यक औषधांची व्यवस्था केली.
या कार्यक्रमाला वेंकटेश फिलामेंट्सचे राजुशेठ चांडक, शामशेठ चांडक, रो. रामचंद्र ढोले, पाटील साहेब, विशाल टेचे उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संजय हिंगमिरे यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन रोटरी क्लबतर्फे चालू असलेल्या आरोग्य व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी रो. नितीन बकाल, रो. गोविंद बाफना, रो. नवनाथ गुल्हाने, रो. शैलेश वखारिया, रो. आनंद बेदमुथा व रणजित थोरात उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्यामुळे हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.





