कोल्हापुरात १५ मार्च रोजी ‘विधी सेवा महाशिबिर’; शासकीय योजना आणि कायदेशीर मार्गदर्शनाची नागरिकांना मिळणार सुवर्णसंधी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

कोल्हापूर, दि. ०९ : समाजातील गरजू आणि वंचित घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच कायदेशीर हक्कांची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात आगामी १५ मार्च रोजी भव्य ‘विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवांचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालय परिसरात सकाळी १० वाजेपासून सुरू होणाऱ्या या शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. या महाशिबिराच्या माध्यमातून नागरिकांना केवळ सरकारी योजनांची माहितीच मिळणार नाही, तर प्रत्यक्ष लाभ आणि तज्ज्ञांचा कायदेशीर सल्ला घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे स्टॉल्स उभारले जाणार असून, त्याद्वारे महसूल, आरोग्य, कृषी, समाजकल्याण, आणि कामगार कल्याण यांसारख्या विविध विभागांच्या योजनांची माहिती दिली जाईल.5000केवळ शासकीय योजनाच नव्हे, तर कायदेशीर साक्षरतेवर या शिबिरात विशेष भर देण्यात आला आहे. ज्या नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती नाही किंवा ज्यांचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत, अशांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वकील आणि तज्ज्ञ मोफत मार्गदर्शन करणार आहेत. सामान्य माणसाला कायद्याची भीती न वाटता, आपल्या हक्कांची कायदेशीर जपणूक कशी करावी, याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिली जाईल.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज घेतलेल्या पाठपुरावा बैठकीत सर्व विभाग प्रमुखांना लाभार्थ्यांची यादी आगाऊ तयार ठेवण्याचे आणि शिबिराच्या दिवशी नागरिकांना प्राधान्याने सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. हे शिबिर म्हणजे प्रशासकीय गतिमानता आणि विधी साक्षरता यांचा मेळ असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या