विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावी : वायकुळे

0

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील
कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘२१ व्या शतकातील महिलांचे स्थान, संधी व आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावी, असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माधवी वायकुळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन केंद्राचे संचालक डॉ. राहुल पालके यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए.बी. शेख यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वायकुळे यांनी आधुनिक काळातील महिलांची बदलती भूमिका, शिक्षणामुळे निर्माण झालेल्या विविध संधी तसेच सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शिक्षण आणि कौशल्यांच्या जोरावर समाजात आपले स्थान निर्माण करावे, असे त्यांनी सांगितले.50000स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासनासह विविध क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळू शकते, यावरही त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंकिता बोटे, रुपाली टिंगरे, रेणुका बोटे, शिवकन्या पोपळघट यांनी महाविद्यालयीन पातळीवरील मुलींसाठी मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा यांचे अनुभव कथन केले. तसेच विविध क्षेत्रांतील करिअर निवडताना मुलींचे प्रश्न व उपाय यावर मनोगते व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा लाभ घेऊन समाजाबद्दल संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करावी, असेही आवाहन डॉ. राहुल पालके यांनी आपल्या मनोगतात केले. कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या करिअर संधीचा त्यांनी ऊहापोह केला. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासन आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या