सोलापूर पोलिस अधीक्षकांचा दणका; ट्रक चालकास मारहाण प्रकरणी दोन पोलिस कर्मचारी निलंबित

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : पंढरपूर शहरातील ट्रक चालकास मारहाण केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.

३ मार्च २०२६ रोजी पंढरपूर शहरातील मंगळवेढा नाका येथे वाहतूक कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता.50000घटनेची चौकशी केल्यानंतर संबंधित दोन पोलिस अंमलदारांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या