कोल्हापूरनिवडपत्रकार विषयकमहाराष्ट्र

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिवपदी विकास भोसले यांनी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

कोल्हापूर : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक कोल्हापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत वरिष्ठ संपादक राजा माने यांची संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राज्य आणि देशभरातील पत्रकारांसाठी ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला (जि. सोलापूर) येथील सतीश भाऊ सावंत, प्रदेश महासचिवपदी कराड येथील विकास भोसले, प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील, राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांचीही निवड करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले की, राज्यातील आणि देशातील पत्रकारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्षम आणि हक्काचे व्यासपीठ उभे केले आहे. बार्शीसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली ही चळवळ आज देशव्यापी होत असून, सर्वांच्या सहकार्याने पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या शासनदरबारी मांडून त्या पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. पत्रकारितेची मूल्ये जपत निःपक्षपातीपणे कार्य करणे, कुटुंब आणि व्यवसायाला प्राधान्य देत समाजाप्रती बांधिलकी जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नूतन प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू. पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्या, तोळामापीचे प्रश्न तसेच विविध व्यावसायिक अडचणी यावर आवाज उठवून शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. “माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन,” असा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला.

या बैठकीस प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीमुळे डिजिटल माध्यमातील पत्रकारांना संघटित व्यासपीठ मिळणार असून, पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button