बार्शीमहाराष्ट्रसत्कार

प्रा.डॉ. राहुल पालके यांचा नेट-सेट परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राहुल पालके यांनी २० व्यांदा नेट-सेट परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळविले आहे. त्यांनी यूजीसीमार्फत डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नेट (राष्ट्रीय पात्रता चाचणी)परीक्षेत आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात यश मिळवले आहे. हेच औचित्य साधून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभागप्रमुख श्री जयकुमारजी शितोळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानगाव येथील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात करण्यात आला.

शितोळे म्हणाले, डॉ पालके यांच्या यशाचे रहस्य त्यांचा विषयाचा व्यासंग, अभ्यासातील सातत्य व वाचन यात आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व आत्मविश्वास वाढला आहे. याप्रसंगी कवी नितीन चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कविता लेखन याबाबत चर्चा केली. मुख्याध्यापक कसबे सर म्हणाले, डॉ पालके सरांच्या यशातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. 500000

विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त आहे. सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे. जिद्द, धैर्य, संयम, परिश्रम, चिकाटी व मार्गदर्शनाने यशाला गवसणी घालता येते. मनात तीव्र इच्छा असेल तर सामान्य परिस्थितीतून असामान्य कार्य करता येते, असे डॉ. पालके म्हणाले. याप्रसंगी शिक्षक, सन्माननीय व्यक्ती, ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button