दिनबार्शीमहाराष्ट्र

‘लायन्स क्लब ‘च्या वतीने बार्शीत ‘संक्रांत महोत्सव’ महिलांच्या कलागुणांना वाव देणारा दोन दिवसीय सांस्कृतिक उत्सव

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी यांच्या वतीने महिलांसाठी विशेष असा दोन दिवसीय ‘संक्रांत महोत्सव’ दि. १० व ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कौशल्याला ओळख मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व स्पर्धांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठीही लकी ड्रॉ द्वारे पैठणी, मिक्सर, इस्त्री व इतर आकर्षक वस्तूंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या हस्ते होणार असून, बक्षीस वितरण समारंभ ऍड. वैशाली कबाडे यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर समारोप समारंभपोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दोन दिवसीय या महोत्सवात शनिवार, दि. १० जानेवारी रोजी खमंग चिवड्याचे प्रकार, चिक्कीचे प्रकार, ज्वारीपासून तयार केलेले तिखट पदार्थ, सुक्या चटण्यांचे प्रकार, रांगोळी स्पर्धा, हेअर स्टाईल, सोलो डान्स तसेच बॉलीवूड फॅशन शो अशा एकूण आठ स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तर रविवार, दि. ११ जानेवारी रोजी श्लोक पठण, हलव्याच्या दागिन्यांनी सजविलेले बाळ, संक्रांतीसाठी शुभेच्छापर ग्रीटिंग तयार करणे, कागदी पतंग बनविणे, मेहंदी स्पर्धा, तिळगुळ आर्ट, संक्रांत हळदी-कुंकू थाळी सजावट, प्रांतीय वेशभूषेत रॅम्प वॉक, मदर-बेबी तसेच ग्रुप डान्स या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

या संक्रांत महोत्सवामध्ये जास्तीत जास्त महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या अध्यक्ष पल्लवी बजाज, सचिव शितल जैन, खजिनदार वैशाली शहा, प्रकल्प प्रमुख अनिता सोनिग्रा व प्रकल्प समन्वयक वैभवी बुडूख यांनी केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button