धाराशिवप्रशासनमहाराष्ट्र

नवरात्रात भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे निर्देश

तुळजापुरात २२ प्रथमोपचार केंद्रे, २८०० पोलिसांचा बंदोबस्त, अखंडित वीजपुरवठा,स्वच्छ पाणी,मोबाईल टॉयलेटसह आरोग्य-सुरक्षेवर विशेष भर

B1न्यूज मराठी नेटवर्क500

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांना सुरक्षित,सुलभ आणि सुविधापूर्ण दर्शनाचा अनुभव मिळाला पाहिजे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही,यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसात समन्वय ठेवून नियोजनातील प्रत्येक बाब काटेकोरपणे पूर्ण करावी.स्वच्छता,आरोग्य,पिण्याचे पाणी,वीजपुरवठा,वाहतूक आणि सुरक्षेच्या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू देऊ नका,असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे.परंपरेनुसार त्याआधी ३ ऑक्टोबर रोजी देवींची मंचकी निद्रा सुरू होणार असून, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे.महोत्सव काळात भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज ३१ ऑगस्ट रोजी सैनिकी विद्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत महोत्सवाच्या पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.500२४ तास अखंडित वीज; रस्त्यांची दुरुस्ती नवरात्र काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत विभागाकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे. वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार नाही,यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांना रस्त्यांवरील अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.त्याचबरोबर भाविकांना इच्छित स्थळी सहज पोहोचता यावे यासाठी आवश्यक ठिकाणी दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.

सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे भाविकांच्या आरोग्य सुरक्षेवर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.आरोग्य विभागाच्या वतीने शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत.महोत्सव काळात साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी साथरोग नियंत्रण पथके नियुक्त केली जाणार आहेत.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button