पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

सामाजिक कार्यात आदर्श ठरलेल्या बार्शीतील तृतीयपंथी किरण मस्तानी यांचा शाही थाटात होणार विशेष पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर तर्फे भव्य जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर रोजी भव्य व दिव्य अशा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हॉटेल सेंट्रल पॉईंट, सात रस्ता, सोलापूर याठिकाणी दुपारी ठीक 4:00 वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, यामध्ये दैनिक संचार चे उपसंपादक तथा स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे तृतीयपंथी किरण मस्तानी यांची विशेष निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी दिली.

किरण मस्तानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील दुर्लक्षित, गरजू व उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य करत सामाजिक सलोखा, माणुसकी आणि समानतेचा संदेश दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले असून, त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते तर अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये किरण मस्तानी यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या या सन्मानामुळे तृतीयपंथी समाजाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यास मदत होणार आहे.

या पुरस्काराच्या घोषणेनंतर सोलापूर जिल्ह्यासह बार्शी परिसरातून किरण मस्तानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार बांधवांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, समाजातील सर्वसामान्य घटकांच्या संघर्ष व योगदानाची पावती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर यांच्या या उपक्रमामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत असून, समाजातील सकारात्मक मूल्यांना चालना देणारा हा पुरस्कार सोहळा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button