बी .पी .सुलाखे कॉमर्स कॉलेज कॉलेजमध्ये पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील बी .पी .सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये दिनांक बी .पी .सुलाखे कॉमर्स कॉलेज कॉलेजमध्ये पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन 16 डिसेंबर 2025 रोजी इयत्ता अकरावी कला व वाणिज्य व दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी इयत्ता बारावी कला व वाणिज्य शाखेकडील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू पांडुरंग शिखरे व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. किरण चपटे सर लाभले होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस बी करंडे सर हे उपस्थित होते.
पालकांना मार्गदर्शन करताना डॉ. शिखरे सरांनी, सध्या विद्यार्थी काय करतो, त्याने काय करावे, सध्या स्पर्धेच्या युगात त्याचे असणारे स्थान काय आहे. अशा अनेक विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
पालकांनी आपल्या पाल्याचे मानसशास्त्र समजून घेतले पाहिजे व त्याच्या वयाचा विचार करून त्याला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांची जडणघडण होत असताना पालकाने त्याला समजून घेऊन, त्याला मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन केले.
या पालक मेळाव्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. काळे एचडी, वाणिज्य विभाग प्रमुख पोहोळकर सर, प्रा. बाबेरे सर, व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते. या पालक मेळाव्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी दोन दिवस परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी केला. व दोन दिवसीय पालक मेळाव्यासाठी पालकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता.




