निवडणूकमहाराष्ट्रमुंबई

उद्या २३ नगरपरिषदांमध्ये मतदान; २१ डिसेंबरला निकालांचा फैसला

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी शनिवार, २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणची मतमोजणी रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार असून, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button