निवडणूकबार्शीमहाराष्ट्र

समाजाची सेवा करण्यासाठी पत्रकार प्रशांत गायकवाड अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तयारीला वेग आला असून, शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय हालचाली जोर धरू लागल्या आहेत.

यामध्ये प्रभाग क्रमांक ९ विशेष चर्चेत आहे, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे प्रशांत गायकवाड आपल्या प्रभागातून उभे करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रभाग क्रमांक ९ हा बार्शी नगरपालिकेतील राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रभाग मानला जातो.

येथील स्थानिक प्रश्नांबरोबरच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमधील सक्रिय सहभागामुळे नागरिकांचे लक्ष या प्रभागाकडे वेधले जात आहे. प्रशांत गायकवाड हे प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरिकांच्या अडचणी यांचा आढावा घेत असून, मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.

स्थानिक पातळीवर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशांत गायकवाड हे अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार म्हणुन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button