आंदोलनबार्शीमहाराष्ट्र

शेलगाव मा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको,थकीत पीक विम्या बाबत बळीराजा आक्रमक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ चा थकीत पीक विमा तत्काळ मिळावा आणि राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केलेली असतानाही बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुली नोटिसा थांबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आज शेलगाव मा येथे शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मंडळ अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन आंदोलना दरम्यान देण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी विकास बारबोले यांनी “कर्जमाफी झाली असतानाही बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून मानसिक त्रास दिला जात आहे, तसेच हक्काचा २०२५ चा पीक विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा यावेळी दिला दिला.तसेच आंदोलन स्थळी मुस्सा मुलाणी, हनुमंत भोसले, पांडुरंग घोलप यांनी मनोगत व्यक्त करतांना पुढील काळात तीव्र आंदोलनासह कृषी मंत्री यांच्या घरावर रुंगणे मोर्चा काढण्याचा इशारा हि देण्यात आला . अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. प्रशासनाने मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.500तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन हि यावेळी हनुमंत भोसले यांनी शेलगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने तालुक्यातील इतर सर्व गावांमधील शेतकरी बांधवांना करण्यात आले. “शेतकऱ्यांनो, आता घरात बसून चालणार नाही. जोपर्यंत आपण प्रत्येक गावात, प्रत्येक चौकात एकत्र येऊन असे रस्ते जाम करणार नाही, तोपर्यंत सरकार आणि विमा कंपन्या आपल्याला आपला हक्काचा विमा देणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या गावात रस्ता रोको आंदोलन उभं करावे अशी विनंती करण्यात आली .

यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख पांडुरंग घोलप,मुसा मुलानी, विकास बारबोले, विनोद होनकळस,ज्योतीराम शिंदे,प्रवीण मारकड, सुरज बारबोले,आतिश लोंढे, हनुमंत भोसले,अरुण व्हणकलस, दादा शिंदे,राम माळी,सागर वाघमोडे,कार्तिक बरगुळे, गणेश शिंदे,स्वप्नील मारकड,उमेश मार्कड,समाधान रोडे. , बंटी रोडे,कृष्णा मारकड,भाऊ काटे,रणजीत बारंगुळे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button