निवडबार्शीमहाराष्ट्र

नांदणीची आकांक्षा यादवची विक्रीकर निरीक्षकपदी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील मौजे नांदणी गावची आकांक्षा रमाकांत यादव हिने स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पाचव्या राज्यसेवा परीक्षेतून तिची प्रथम प्रयत्नातच विक्रीकर निरीक्षक (Sales Tax Inspector) पदावर निवड झाली आहे.

आकांक्षाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वैराग येथे झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून तिने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड असलेल्या आकांक्षाने पदवी शिक्षणानंतर ऑनलाइन मार्गदर्शन घेत वैराग येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

या यशाच्या जोरावर आकांक्षा आता UPSC परीक्षेतही आपले नशीब आजमावणार आहे. तिचे आई-वडील प्राथमिक शिक्षक असून, मुलीने मिळवलेले हे यश त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारे ठरले आहे. नांदणी व वैराग परिसरातून आकांक्षावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button