कृषीबार्शीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सुधारित तंत्राचा वापर करावा : मा. आमदार राजेंद्र राऊत

मराठा सेवा संघ, बार्शी च्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेती फवारणीच्या ड्रोन कार्यशाळेचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सुधारित तंत्राचा वापर करावा, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. मराठा सेवा संघ प्रणित पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद बार्शीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेती फवारणीच्या ड्रोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून मा. आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.50000या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, कृषी अधिकारी विलास मिस्किन, जीवन जगदाळे, रविंद्र भोसले, सयाजी गायकवाड, सुधीर काशीद, मराठा सेवा संघाच्या माजी अध्यक्षा शोभाताई घुटे, जिल्हा उपाध्यक्ष किरण कोकाटे, अध्यक्ष संतोष मोळवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब घोडके आणि सचिव रावसाहेब यादव यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सुधारित अवजारे, यंत्रे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करावी. शासन मान्यता प्राप्त अनुदानास पात्र असणाऱ्या ड्रोनबाबतची माहिती देताना मास्टर ट्रेनर प्रकाश पाटील आणि अनिल यादव यांनी ड्रोनच्या विविध घटकांची ओळख, कार्यपद्धती आणि औषध फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी शासनाच्या योजनांमधून मिळणाऱ्या अनुदानाबाबत आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.50000यावेळी संभाजी घाडगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक विचारसरणी सोडून शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी परिषदेचे गणेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विक्रम सावळे यांनी मानले. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांचे पदाधिकारी, कृषी परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील शेतकरी तसेच तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button