बार्शीमहाराष्ट्र

बार्शीत पोलीस कॉन्स्टेबल मोहन कदम यांनी दोन तासात कामगिरी केली फत्ते

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस मोहन अर्जुन कदम यांच्या कडे शशिकला काळे नावाच्या वयस्कर महिला तक्रार घेऊन आल्या की त्यांचा मोबाईल बस स्थानकावर किंवा बस मध्ये गाहाळ झाला आहे, त्यांची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये नोंद करून घेतली.

लगेच तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल मोहन अर्जुन कदम यांनी शोध चालु केला व त्यांनी कौशल्यपूर्ण शोध घेऊन अवघ्या दोन तासांत बस स्थानकाचा बसचा तपास घेऊन तो मोबाईल शोधून काढला आणि त्या वयस्कर महिला ला परत दिला, त्यांची ही कामगिरी उल्लेखनीय आहे,यासाठी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी त्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button