कृषीबार्शीमदतमहाराष्ट्र

बार्शी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी माळी कुटुंबाला आमदार राजेंद्र राऊत यांचा आधार! मुलाला महावितरणमध्ये आउटसोर्सिंग विभागात नोकरीची तात्काळ प्रक्रिया; व्यक्तिगत ५० हजारांची केली मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुक्यातील कासारी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सुभाष भानदास माळी यांच्या कुटुंबियांची सोलापूर विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. माळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याचे लक्षात घेऊन आमदार राऊत यांनी त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी विविध पातळ्यांवर तातडीने मदतीची कार्यवाही सुरू केली.

यावेळी माळी यांच्या मुलाला महावितरणच्या आउटसोर्सिंग विभागात नोकरी मिळण्यासाठी तात्काळ प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच भविष्यातही माळी कुटुंबाला आवश्यक ती सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार राऊत यांनी दिले.

माळी कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी कोणताही गाजावाजा न करता , कलसीही वाच्छता न करता स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर ५० हजार रुपयांची रोख मदत केली. या मदतीमुळे संकटाच्या काळात कुटुंबाला मोठा आधार मिळाल्याची भावना माळी कुटुंबियांनी व्यक्त केली.500

यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना संकटाच्या काळात खचून न जाण्याचे आवाहन केले. दुष्काळ, आर्थिक अडचणी किंवा अन्य कोणत्याही संकटामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही आमदार राऊत यांनी यावेळी नमूद केले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यासह संबंधित उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button