उद्घाटननवी दिल्लीमहाराष्ट्र

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिट प्रकल्पाचेनिवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते भूमिपूजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली, 5 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोपर्निकस मार्क स्थित महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन निवास आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्र सदन परिसरातील पालापाचोळा आणि दोन कॅन्टीनमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करून सेंद्रिय खत तयार करणे असा असल्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांनी यावेळी सांगितले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन परिसरात असलेल्या मुबलक झाडांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि दोन्ही कॅन्टीनमधून उरलेला भाजीपाला, तसेच इतर सेंद्रिय कचरा जमा होतो. या कचऱ्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करण्यासाठी 3 टन क्षमतेचे दोन कंपोस्ट पिट्स उभारण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सामूहिक चर्चेतून घेतला असल्याचे सांगून श्रीमती आर विमला म्हणाल्या, या पिटमधून तयार होणारे सेंद्रिय खत परिसरातील विस्तीर्ण बागा आणि झाडांना पोषक ठरेल, ज्यामुळे हरित क्षेत्र अधिक समृद्ध आणि टिकाऊ होईल.

हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. कंपोस्ट पिटमुळे जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे होईल आणि नैसर्गिक खतामुळे महाराष्ट्र सदनातील बागांचे सौंदर्य तसेच पर्यावरणीय समतोल वाढेल, असेही श्रीमती आर.विमला यांनी यावेळी सांगितले.

या भूमिपूजन कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉक्टर राजेश आडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, महाराष्ट्राचा त्यांचे व्यवस्थापक प्रमोद कोलते, निवासी अभियंता किरण चौधरी, सेक्शन इंजिनियर जेपी गंगवार, ज्युनिअर इंजिनियर, प्रियंका नागे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button