बार्शी तालुका पोलिसांची शेलगाव येथील जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सात जणांवर गुन्हा दाखल, ३ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, शेलगाव (मा.) येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच विविध मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी शेलगाव (मा.), ता. बार्शी येथील धाराशिवकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडांच्या परिसरात काही इसम ‘मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाली.
माहिती मिळताच अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह तातडीने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या सात जणांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि विविध मोटारसायकली असा एकूण ₹३,५७,९००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाणे गुरनं. २६०/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींची नावे
१. अमोल उर्फ बालाजी बब्रुवान काळे (वय ३२)२. सुनिल माणिक मारकड (वय ३६)३. रमेश सिध्दाराम खांडेकर (वय ६०)४. नंदकुमार उत्तम माळी (वय ३८)५. काका उर्फ लक्ष्मीकांत व्यंकटेश मारकड (वय ४४)६. आकाराम गंगाधर शिंदे (वय ५५)७. दिलीप उर्फ रमेश वैजिनाथ काळे (वय ३९)
सर्व रा. शेलगाव (मा.), ता. बार्शी.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, सागर वाकळे, शिवशंकर खराडे, कावळे आणि अमृता गुंड यांनी सहभाग घेतला. अवैध धंद्यांविरोधात बार्शी तालुका पोलिसांची ही धडक कारवाई सुरूच राहणार असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.




