शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक जिमचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुणे : शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी येथील अत्याधुनिक जिमचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवछत्रपती क्रीडा संकुलात मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत सात क्रीडा प्रकारांचे हाय परफॉर्मन्स सेंटर कार्यान्वित असून ही अत्याधुनिक जीम खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी क्रीडा आयुक्त दीपक सिंगला, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, माणिक पाटील, क्रीडा अधिकारी चनबस स्वामी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाल्या, आधुनिक व्यायाम साहित्य, अद्ययावत सुविधा आणि खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन या जिमची उभारणी करण्यात आली आहे. विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी या सुविधेचा मोठा फायदा होईल.

बालेवाडी येथे राज्य शासनाची क्रीडा प्रबोधिनी व केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेंतर्गत राज्य निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुलाकरीता शासनाकडून एकूण रु.७३६. ५९ लक्ष इतका निधी प्राप्त झालेला असून त्यामधून आधुनिक फ़िटनेस सेंटर उभारण्यात आले आहे. त्यापैकी बांधकामाकरीता रू.४७० लक्ष तर आवश्यक साहित्याकरीता रू.२६६.५९ लक्ष खर्च करण्यात आलेला आहे.509शिवछत्रपती क्रीडा संकुल १५१ एकर परिसर असून या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसीत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शूटिंग, बॉक्सींग, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, जलतरण, ॲथलेटिक्स, हॉकी, फूटबॉल, बॅडमिंटन हॉल, फिटनेस सेंटर, स्पोर्टस सायन्स सेंटर इ. सुविधा विकसीत करण्यात आलेल्या आहेत.

शिवछत्रपती क्रीडा संकुलात नॅशनल गेम्स १९९४, कॉमनवेल्थ युथ गेम्स २००८, खेलो इंडिया युथ गेम्स २०१९, एटीपी टेनिस २०१८ ते २०२२, वुमन फूटबॅाल एशियन चॅम्पीयनशीप २०२१, १३ वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा २०१३ तसेच विविध खेळांच्या राज्य राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाद्वारे सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून या ठिकाणी ३८६ विविध खेळांचे दैनंदिन प्रशिक्षण घेण्यात येते. यावेळी ॲथलेटिक्स व वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकाराचे विदेशी क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या