जयंतीमहाराष्ट्ररायगड

सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

अलिबाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दिनांक 08 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने आज भीम पदयात्रा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात समाज कल्याण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यानंतर भीम पदयात्रेची सुरुवात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली आणि तेथे पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाचे कर्मचारी, विद्यार्थी व बाह्यस्रोत कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाबाबत सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांना अनुसरून सामाजिक समतेचा संदेश जनमानसात पोहोचविणे, हेच या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट होते.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button