बार्शीमहाराष्ट्रयात्रा

गुळपोळी येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गुळपोळीच्या श्री भैरवनाथ यात्रेला शुध्द चैत्र पोर्णिमेला शनिवार पासून प्रारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथे एप्रिल महिन्यात म्हणजे शुध्द चैत्र पोर्णिमेला अर्थात हनुमान जयंतीला गुळपोळी येथे श्री भैरवनाथ (जोगेश्वरी) यात्रेला शनिवार पासून प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन भाविक भक्त दर्शनाला येतात. महाराष्ट्रात तीर्थक्षत्र म्हणून गुळपोळी या गावाला ओळखले जाते. श्री भैरवनाथाचा आवतार महादेवाचा आहे.

बऱ्याच काळापासून गुळपोळीत यात्रा भरली जाते. अतिशय सुंदर पध्दतीने यात्रा पार पाडली जाते दर रविवारी सायंकाळी भैरवनाथ मंदिरात महाआरती केली जाते. त्याच बरोबर महाप्रसाद वाटप असतो. चैत्र शुध्द व्द|हाशीला देव गावा बाहेर नऊ दिवस घटस्थापना केली जाते.

चैत्र पोर्णिमेला दिवशी मध्य रात्रि पासून श्री भैरवनाथ देवाला पुरण पोळीचा नैवद्य देऊन त्यावेळेपासून यात्रेला प्रांरभ होतो.

शनिवार दि.१२/४/२५ रोजी सकाळी ६.०० वा. भजन व शेरण्या श्री हनुमान जन्मोत्सव, शनिवार दि.१२/४/२५ रोजी सकाळी ९ ते ५ आरत्या व शेरण्या व रात्री ९ ते १२ वा. श्री भैरवनाथ महात्म्य कथा सादरकर्ते : स्वर सम्राट मनोज भडकवाड सुर्डीकर, रविवार दि.१३/४/२५ रोजी सकाळी ९ वा. अंबील रथयात्रा कोरफळे ते गुळपोळी स्वागतोत्सुक श्री येडेश्वरी मित्र मंडळ, गुळपोळी ,रविवार दि.१३/४/२५ रोजी रात्री ९ वा. पारंपरीक सोंग्याचा कार्यक्रम, छबीना व शोभेची दारू छबीना बॅण्ड: जनता ब्रॉस बॅण्ड, पाटोदा, सुजित ब्रॉस बॅण्ड, पारगाव, ता. वाशी सोमवार दि. १४/४/२५ रोजी दुपारी ३ वा. जंगी कुस्तीचे मैदान सोमवार दि. १४/४/२५ रोजीरात्री ९ वा. धुमधडाका ऑकेस्ट्रा मंगळवार दि.१५/४/२५ रोजी रात्री ९ वा. लोकनाट्य तमाशा विशालकुमार भाडळेकर सह काजल पुणेकर सुनिल मंडप अॅण्ड लाईट डेकोरेशन, पानगांव, ता. बार्शी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9 वाजता गुळाच्या शेरणी देवास निहिण्यास सुरुवात होते. गाजत वाजत श्री भैरवनाथची काठी घेऊन शेरण्या निहिल्या जातात. सायंकाळी आरती भैरवनाथाची केली जाते. त्यावेळी गावातील भाविक ग्रामस्थ बाहेर गांवाहुन आलेले लोक आरतीसाठी उपस्थित मोठया संख्येने भैरवनाथ मंदिरात असतात. दर रविवारी श्री भैरवनाथ मंदिरात आरती केली जाते. महाप्रसाद वाटप केला जातो. प्रसाद घेण्यासाठी मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी असते.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी मानाची काठी मानकरी मालवंडीहुन घेऊन भाविक गुळपोळी येतात. आणि कोरफळे गावातील भाविकाना आबीलचा गाडा किवा माठ दिला जातो. ते शुध्दा भक्ति भावाने गुळपोळीच्या भैरवनाथ (जोगेश्वरी ) देवाच्या दर्शनाला लोक येतात.

तिसऱ्या दिवशी देवाचा छबिना काढून मिरवणूक काढण्यात येते. छबिन्यात व छबीण्यापुढे पारंपारिक लोककलेची वेशभूषा करुन कार्यक्रम चांगल्या प्रकारे केला जातो. त्यामध्ये राम लक्ष्मण सीता, हनुमंत ,रामायण, महाभारत ,पांडव इत्यादि कलेच्या स्वरुपात कलाकाराने आपली वेशभूषा सादर केली जाते. त्यामध्ये तरुण वर्ग सहभागी असून सर्व वर्गातून सहभाग घेतला जातो. यात्रेचा सांगता आश्या प्रकारे श्री भैरवनाथ यात्रा गुळपोळी मध्ये गुण्या गोविंदाने साजरी केली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button