ह .भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांना वै. डॉ रामचंद्र देखणे स्मृती किर्तन सेवा पुरस्कार जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : संत विचार प्रबोधनी ,पुणे आयोजित वै. डाॅ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा २०२५ या सोहळ्याचे आयोजन रविवार दि १३/४/२०२५ रोजी सायंकाळी ५:३० वा टिळक स्मारक पुणे येथे होणार आहे.
या सोहळ्यामध्ये ह.भ.प.डाॅ. जयवंत महाराज बोधले ,श्रीक्षेञ पंढरपूर ( श्री संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज) यांना डाॅ.रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेञाचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविददेव गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ह.भ.प डाॅ. जयवंत महाराज बोधले यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांसाठी उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत दादा पाटील आमदार श्रीकांत भारतीय यांची प्रमुख उपस्थिती व डाॅ अरुणा ढेरे ( संमेलानाध्यक्ष मराठी साहित्य संमेलन ) या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच वासकर महाराज फडाचे राणा महाराज वासकर श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान समितिचे विश्वस्त श्री योगी निरंजनाथ यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.