आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी भेटीतून जाणून घेतली विधीमंडळाच्या कामांची माहिती

B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर : जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहास भेट देऊन विधीमंडळाच्या कामांची माहिती जाणून घेतली. लोकशाहीची कार्यपद्धती, निर्णयप्रक्रिया आणि विधिमंडळाच्या कामकाजाविषयी माहिती घेताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जिज्ञासा दिसून आली.
यावेळी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधत या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीबाबत अधिक जागरूकता निर्माण होऊन जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी व गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणीही भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य बापूसाहेब रुपनर, शिक्षक बी. एन. फंड, एस. आर जठार, एस. एल पवार उपस्थित होते.