चार जिल्ह्यातून चोरीस गेलेले 31 मोटर सायकली पंढरपूर पोलिसांनी केल्या जप्त , दोन आरोपींसह सुमारे अठरा लाखाचा मुद्देमाल घेतला ताब्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

0

B1न्युज मराठी नेटवर्क / प्रतिनिधी दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यासह पुणे ,सातारा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या एकतीस मोटरसायकली सह दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती आज उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील मोटरसायकल ही कर्नाटक येथील रेकॉर्डवरील आरोपी याने चोरली असल्याची माहिती मिळाली सदर इसमावर पाळत ठेवत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांचे पथकाने आरोपीला रात्री त्याचे घरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल करत त्याचे पुणे येथील साथीदारासोबत चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान त्याच्याकडून एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या सदर गुन्ह्यातील त्याचा साथीदार यास पुणे येथे त्यांचे राहते घरी पाळत ठेवून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे ही तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे सांगितले व या गुन्ह्यातील सोळा मोटरसायकली अशा एकूण ३१ मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरच्या मोटरसायकली या पंढरपूर शहर, अकलूज ,मंद्रूप, मोहोळ, सोलापूर शहर, खडक, खेड, इंदापूर, मावळ, शिरूर, हवेली, यवत, तळेगाव दाभाडे, जेजुरी, आंबेगाव,लाहोरा, उमरगा, फलटण इत्यादी ठिकाणाहून चोरले असल्याचे माहिती मिळाली.
यातील आरोपी राजू उर्फ गुड्या मधुकर पवार वय 19 राहणार शेंद्री चाळ पिंपरी पुणे व श्रीकांत मलकाप्पा नडगिरे वय 25 राहणार खजुरी जिल्हा गुलबर्गा कर्नाटक यांच्यावर 379 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरात पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जवळपास 150 मोटरसायकली रिकव्हर केले असून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोटरसायकली रिकव्हर केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. सध्या पोलिसांकडून इफेक्टिव पोलिसिंग करून मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

सदरची कामगिरीही शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदूम ,पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद कदम, बिपिनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलांनी, इरफान शेख, शोएब पठाण, महेश पवार, सुनील बनसोडे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, विनोद पाटील ,अर्जुन केवळे, अन्वर आत्तार यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार इरफान मुलांनी व पोलीस नाईक इरफान शेख आणि शोएब पठाण हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या